बातम्या

अमळनेर वॉर्ड क्रमांक 14 मध्ये परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल: सौ. ज्योती पंकज शेटे (MA Bed Politics) यांना नगरसेविका म्हणून संधी देण्याची मागणी

वॉर्ड 14 मध्ये नवा इतिहास घडणार? ज्योती पंकज शेटे यांना प्रचंड प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 14 मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून एक नवीन चेहरा आणि उत्साही उमेदवार म्हणून सौ. ज्योती पंकज शेटे (MA Bed Politics) यांना संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये पती पंकज संतोष शेटे यांच्या पत्नी असलेल्या सौ. ज्योती शेटे यांच्या रूपाने महिला सक्षमीकरण आणि विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शहरातील स्व.दादासो.संतोष सोनू शेटे (मा.प्रशासन अधिकारी) यांनी शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला असतानाच आता त्याच्या सूनबाई सौ. ज्योती पंकज शेटे (MA Bed Politics) सामाजिक आणि राजकीय एक नवा आदर्श घेऊन प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपला अनुभव घेऊन येत आहे. व्यापक जनसंपर्क असलेल्या व अभ्यासू असल्याने विकासकामांची सूत्रबद्ध सुरुवात करण्याची त्यांची हातोटी आहे,

संधीचे कारण : सामान्य कुटुंबातील प्रतिनिधी हवा

सौ.ज्योती पंकज शेटे हे सामान्य परिस्थितीतून आले आहेत. त्यामुळे, गरिबांचे प्रश्न आणि दैनंदिन समस्या यांची त्यांना खरी जाण आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आजवर निवडून आलेले प्रतिनिधी उच्चभ्रू वर्गाचे असल्याने, त्यांना प्रभागातील मूलभूत समस्यांची गंभीरता कधीच कळली नाही.

नागरिकांचे मत : “पंकज हा आमच्यातीलच एक आहे. त्याने स्वतः परिस्थिती अनुभवली आहे. पाणी, रस्ते, गटारे, वीज यांसारख्या समस्यांसाठी तो नेहमी धावून येतो. केवळ निवडणुकीपुरता नाही, तर वर्षभर तो नागरिकांच्या मदतीला असतो. आम्हाला आता ‘जनप्रतिनिधी’ नाही, तर ‘जनसेवक’ हवा आहे आणि सौ.ज्योती पंकज शेटे हेच ते खरे जनसेवक आहेत.”

🙋‍♀️ महिला सक्षमीकरण आणि विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी
सौ. ज्योती शेटे यांच्या उमेदवारीसाठी जोर लावणारे नागरिक प्रभागाला नवीन चेहरा हवा असल्याचे स्पष्ट करत आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर काम होण्याची अपेक्षा आहे:
📢 * महिला सक्षमीकरण: महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणे, त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागी करणे आणि त्यांच्यासाठी विशेष योजना राबवणे.
📢 * आरोग्य सुविधा: प्रभागातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारणे आणि आरोग्य विषयक जनजागृती करणे.
📢* शिक्षण: गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे, डिजिटल शिक्षण प्रणालीवर भर देणे आणि शाळांची गुणवत्ता वाढवणे.
📢 * समाजकार्य: प्रभागातील वंचित घटकांसाठी मदत कार्य, सामाजिक एकोपा वाढवणे आणि गरजू लोकांसाठी योजना राबवणे.
📢 * शौचालय: सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवणे, त्यांची स्वच्छता व देखरेख सुनिश्चित करणे, विशेषतः महिलांसाठी स्वच्छ शौचालये उपलब्ध करणे.
📢 * महिला बचत गट: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी नवीन महिला बचत गट स्थापन करणे आणि कार्यरत गटांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे.

✨ परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पंकज संतोष शेटे यांच्या पत्नी सौ. ज्योती पंकज शेटे यांच्या सक्रिय सहभागाने वॉर्ड क्रमांक 14 च्या विकासाला नवी गती मिळेल. एका सुशिक्षित आणि सामाजिक जाणीव असलेल्या महिला नेतृत्वाला संधी मिळाल्यास वॉर्डातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. ही केवळ एक उमेदवारी नसून, परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल, असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे.

🛑एकच ध्येय प्रभागाचा विकास🛑
यंदा सौ. ज्योती या रिंगणात असल्या तरी, प्रभाग क्रमांक 14 च्या नागरिकांचा दृढ विश्वास पंकज शेटे यांच्या ‘कार्याच्या सत्तेवर आहे. नागरिक म्हणतात ” पंकज शेटे आणि यांचे कुटुंब हे केवळ सामाजिक, व राजकीय क्षेत्रातीलच नाही, तर आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. यांचे कार्य आणि सेवा हे अविरत सुरू राहण्यासाठी आम्ही त्यांनाच निवडणार ! “ज्योती ताई यांच्या माध्यमातून पंकज भाऊ शेटे यांची ‘जनतेची सेवा’. करण्याची परंपरा पुढे सुरू राहणार आहे. नागरिकांचा हा अभूतपूर्व पाठींबा पाहता प्रभाग क्रमांक 14 मध्ये कै. संतोष सोनू शेटे परिवाराचा विजय जवळ पास निश्चित मानला जात आहे….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!