बातम्या

प्रभाग ७ मध्ये भक्तीचा महापूर!ह.भ.प. शिवलीलाताईंच्या कीर्तनाला गर्दी! भिकनभाऊंच्या कार्यक्रमाची खास झलक!

आमदार राजूमामा भोळेंची 'ग्रँड एन्ट्री'! भिकनभाऊंच्या नियोजनाचे केले तोंडभरून कौतुक.

जळगाव (विशेष प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक ७ मध्ये केवळ राजकीय वारे नाही, तर भक्तीचे वारे सुद्धा जोरात वाहत आहेत. समाजसेवक श्री. भिकन मुरलीधर हिवराळे आणि शिवकॉलनी परिसर मित्र मंडळ आयोजित भव्य कीर्तन सोहळा काल (रविवारी) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाला ऐकण्यासाठी शिवकॉलनीकरांनी अक्षरशः ‘जनसागर’ लोटला होता. गणेश कॉलनी चौक भाविकांच्या गर्दीने खचाखच भरला होता.

मान्यवरांची मांदियाळी: या भव्य सोहळ्याला जळगावचे लोकप्रिय नेतृत्व श्री. राजूमामा भोळे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच नानाभाऊ सोनवणे, माजी नगरसेविका सौ. दीपमाला काळे, सौ. राखीताई सोनवणे आणि सौ. अनिताताई सोनवणे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भिकनभाऊंच्या कार्याचे कौतुक: कार्यक्रमाची भव्यता आणि शिस्तबद्ध नियोजन पाहून उपस्थित मान्यवरांनी आयोजक भिकनभाऊ हिवराळे यांचे विशेष कौतुक केले. “समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि तरुणांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शिवलीलाताईंनी जिंकली मनं: आपल्या खास शैलीत आणि विनोदी ढंगात ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तरुणाई आणि महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. “संसारात राहून परमार्थ कसा साधावा,” याचे बाळकडू त्यांनी आपल्या कीर्तनातून दिले.

आभार: एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजक भिकनभाऊ हिवराळे यांनी सर्व मान्यवरांचे आणि शिवकॉलनीतील माता-भगिनी व नागरिक बंधूंचे मनापासून आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!