राजकारण

महापालिका रणशिंग! प्रभाग ४ मध्ये कोकिळाबाई पाटील यांची जोरदार उमेदवारी

जळगावात राजकीय धमाका! प्रभाग क्र. ४ मध्ये निवडणुकीचे रणशिंग!

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले ‘विर जवान ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप युवामोर्चाचे माजी शहर उपाध्यक्ष राहुल तुकाराम पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. त्यांच्या ‘दक्षराज कन्स्ट्रक्शन’ च्या वतीने आयोजित २०२६ च्या भव्य दिनदर्शिका लोकार्पण सोहळ्यातून त्यांनी प्रभाग क्रमांक ४ मध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे.

या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, राहुल पाटील यांच्या मातोश्री सौ. कोकिळाबाई तुकाराम पाटील यांनी जळगाव महानगरपालिका वार्ड क्रमांक ४ मधून आपली उमेदवारी जाहीर करण्याची तयारी दर्शवली असून, या कार्यक्रमात त्यांना मिळालेला दिग्गजांचा पाठिंबा विजयाची नांदी मानला जात आहे.

🌟 राजकीय दिग्गजांची मांदियाळी आणि ‘आशीर्वाद’ सदर सोहळा जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, ज्येष्ठ नेते कैलास आप्पा सोनवणे, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर नितीन भाऊ लड्डा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील भाऊ महाजन आणि ललित (भैया) भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते पार पडला.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी राहुल पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “राहुल पाटील हे तरुणांचे नेतृत्व असून, ‘दक्षराज कन्स्ट्रक्शन’ आणि ‘विर जवान ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या मातोश्री कोकिळाबाई पाटील यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील,” अशा भावना नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

🔥 प्रभाग ४ मध्ये जोरदार चर्चा राहुल पाटील हे भाजप युवामोर्चाचे माजी शहर उपाध्यक्ष असल्याने त्यांचा तरुण वर्गात मोठा जनसंपर्क आहे. त्यातच आता ‘दक्षराज कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करून त्यांनी प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे. सौ. कोकिळाबाई पाटील यांच्या रूपाने प्रभागाला एक सुसंस्कृत आणि ‘घरची’ उमेदवार मिळणार असल्याने मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक, विर जवान ग्रुपचे सदस्य, दक्षराज कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः प्रभाग क्रमांक ४ मध्ये आतापासूनच निवडणुकीची हवा तापली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!