बातम्या

नशिराबाद पोलीसांचा धडाका!गोमांस, वाळू, दारू, जुगार… नशिराबाद पोलिसांचा तुफानकारवाई

API योगिता नारखेडेंच्या नेतृत्वाखाली मोठी कामगिरी!

नशिराबाद | प्रतिनिधीजळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता नारखेडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या महिनाभरात (२७ डिसेंबर २०२५ ते आजपावेतो) राबवलेल्या विशेष मोहिमेत नशिराबाद पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारी टोळीला जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले असून, खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वाळू माफिया आणि अवैध धंद्यांवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

🔹 गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या
गु.र.न. १०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९ वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यातील ८ महिन्यांपासून फरार असलेल्या ०३ आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
तसेच गु.र.न. १७७/२०२५ (पिटा कायदा) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील २ महिन्यांपासून फरार असलेल्या ०१ आरोपीसही अटक करण्यात आली आहे.

🔹 हद्दपार कारवाई

नशिराबाद पोलीस स्टेशन कडील टोळी हद्दपार प्रस्ताव क्र. ०१/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे
सराईत ०५ गुन्हेगारांविरुद्ध मा. पोलीस अधीक्षक सो. यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यास मंजुरी मिळून सदर ०५ आरोपींना जळगाव जिल्ह्यातून ०१ वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश झाल्याने,
त्यांना जळगाव जिल्हा हद्दीतून मोताळा, जि. बुलढाणा येथे घालवून देण्यात आले आहे.

🔹 ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय यश

मा. पोलीस अधीक्षक सो. यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत
सन २०१८ पासून आजपावेतो मिसिंग असलेल्या स्त्री व पुरुषांचा शोध घेण्यात आला.
या मोहिमेत एकूण ०५ मिसिंग व्यक्ती सुरक्षितरीत्या मिळून आल्या आहेत.

तसेच नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या
गु.र.न. १४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील
अपहृत मुलाचा शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.

🔹 गोमांस बाळगणे प्रकरणी कडक कारवाई

गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर
नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गोवंश सदृश्य प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी
गु.र.न. २०२/२०२५ तसेच गु.र.न. ०१/२०२६
भारतीय न्याय संहिता कलम २७५, ३२५ सह
प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५.५(सी), ९, ९(सी) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईत सुमारे २२,०००/- रुपये किमतीचे गोवंश सदृश्य मांस जप्त करण्यात आले असून
०२ आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.

🔹 अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

विभागीय गस्तीदरम्यान गोदावरी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलावर
डंपर क्र. MP-48-H-0583
चालक आरोपी पवन सुपडु पाथवरट, रा. साकेगाव
हा अवैधरीत्या वाळू चोरी करून तिची चोरटी वाहतूक करताना मिळून आला.

त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशन येथे
गु.र.न. २०३/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात डंपर व अवैध वाळू असा एकूण अंदाजे ३,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔹 प्रोहिबिशन कारवाई – ०६ गुन्हे

गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार
गा.ह.भ. ची दारू तसेच देशी-विदेशी दारू अवैधरित्या बाळगून चोरटी विक्री करणाऱ्या ०६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत एकूण २३,८५०/- रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

🔹 सट्टा-जुगारावर कारवाई

नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत
अवैधरित्या चालणाऱ्या सट्टा-जुगारावर कारवाई करून ०१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून
सुमारे ५५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीस स्टेशनच्या या सर्व कारवायांमुळे परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून, गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे.
ही संपूर्ण कामगिरी API योगिता नारखेडे मॅडम व त्यांच्या पथकाने प्रभावीपणे पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!