राजकारण

प्रभाकर सोनवणेंच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपामध्ये धुसफुस तर शिवसेनेत नाराजी

जळकेकर महाराजांच्या उमेदवारीवर टांगती तलवार का पवन सोनवणेंसमोर नवे आव्हान ?

  • जळगाव । विशेष प्रतिनिधी । चोपडा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात ‘उबाठा’ गटाकडून नशीब आजमावणारे आणि आता पुन्हा भाजपच्या गोटात दाखल झालेले प्रभाकर गोटू सोनवणे यांच्या प्रवेशामुळे जळगावच्या ग्रामीण राजकारणात, विशेषतः म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटात मोठी खळबळ उडाली आहे. सोनवणे यांच्या या ‘आयाराम-गायाराम’ वृत्तीमुळे भाजपमधील निष्ठावंत आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत ‘ऑल इज वेल’ नसल्याचे संकेत मिळत आहेत.

​राजकीय प्रवास: निष्ठा की सोय?

​प्रभाकर सोनवणे यांचा राजकीय आलेख हा सातत्याने बदलत्या भूमिकांचा राहिला आहे.

​२०१४: शिवसेनेच्या तिकिटावर बाजार समितीचे संचालक पद.

​भाजप प्रवेश: त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून पत्नी अंजनाताई सोनवणे यांना जळगाव मनपाच्या वॉर्ड क्र. १३ मधून नगरसेविका म्हणून निवडून आणले.

​२०२४ ची बंडखोरी: विधानसभा निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBTHA) गटाकडून निवडणूक लढवली.

​२०२५ (सध्या): निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांतच पुन्हा भाजपमध्ये प्रवेश.

​एवढ्या कमी कालावधीत झालेले हे पक्षांतर केवळ सत्तेच्या समीकरणांसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

​निष्ठावंतांचा प्रश्न: जळकेकर महाराजांचे काय?

​या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांना बसण्याची शक्यता आहे. म्हसावद-बोरनार हा गट भाजपसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. जळकेकर महाराज गेल्या अनेक दिवसांपासून या गटातून जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत.

एकीकडे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे जळकेकर महाराज, आणि दुसरीकडे सोयीनुसार पक्ष बदलणारे प्रभाकर सोनवणे, या द्वंद्वात पक्षश्रेष्ठी कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर सोनवणेंच्या पत्नीला उमेदवारी दिली गेली, तर भाजपमधील निष्ठावंत गट बंडाच्या पवित्र्यात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

​पवन सोनवणे आणि ‘महायुती’चा पेच

​केवळ भाजपच नाही, तर या प्रवेशामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटातही अस्वस्थता आहे. शिंदे गटाचे युवा नेतृत्व पवन सोनवणे यांनी म्हसावद-बोरनार गटातून आपली दावेदारी प्रबळ केली आहे. त्यांनी जनसंपर्क मोहिमेद्वारे मतदारांमध्ये स्थान निर्माण केले आहे.

मात्र, प्रभाकर सोनवणे यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात दोनदा बंडखोरी केली असतानाही, भाजपने त्यांना पुन्हा प्रवेश दिल्याने शिवसैनिकांमध्ये संताप आहे. “आमच्या विरोधात काम करणाऱ्यांना मित्रपक्ष पक्षात घेतोच कसा?” असा सवाल शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. यामुळे आगामी काळात ‘महायुती धर्म’ पाळला जाईल की स्थानिक पातळीवर छुपी युती होईल, याबाबत साशंकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!