बातम्या

वीर गुर्जर क्रिकेट लीग (VGCL 2) साठी शिवम मावी चोपड्यात येणार; नवलसिंग राजे पाटील यांचे निमंत्रण

नवलसिंग राजे पाटील यांचा पुढाकार — शिवम मावी येणार चोपड्यात, पुढचा टार्गेट भुवनेश्वर कुमार!

वीर गुर्जर क्रिकेट लीग (VGCL 2) साठी शिवम मावी चोपड्यात येणार; नवलसिंग राजे पाटील यांचे निमंत्रण

चोपडा: गुर्जर समाजातील एक गौरव आणि भारतीय क्रिकेट संघातील युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी, जे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांसारख्या मोठ्या संघांकडून खेळले आहेत, ते चोपडा येथे आयोजित होणाऱ्या ‘वीर गुर्जर क्रिकेट लीग’ (VGCL) च्या दुसऱ्या सत्राच्या (VGCL 2) उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री गुलाबरावजी पाटीलसाहेब यांचे स्वीय सहाय्यक तसेच सर्व क्रिकेट लीगचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे नवलसिंग राजे पाटील यांनी शिवम मावी यांच्याशी संपर्क साधून त्यांना या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. मावी यांनी या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत, VGCL 2 चा कार्यक्रम निश्चित झाल्यावर चोपड्यात येऊन स्पर्धेची शोभा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

नवलसिंग राजे यांचे क्रिकेट आणि समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. VGCL 2 साठी शिवम मावी यांना निमंत्रित करून त्यांनी युवा खेळाडूंना प्रेरणा देण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न केला आहे.

याव्यतिरिक्त, नवलसिंग राजे पाटील यांनी भारतीय संघाचे अनुभवी आणि उत्कृष्ट वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनाही आगामी VGCL 2026 साठी निमंत्रित करण्याच्या उद्देशाने चर्चा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

नवलसिंग राजे हे GPL (गुलाबराव पाटील लीग), DGCL आणि GSPL यांसारख्या विविध क्रिकेट स्पर्धांना नेहमीच सहकार्य करून समाजातील खेळाडूंच्या हितासाठी आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी पुढाकार घेत असतात. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल VGCL आयोजन समितीने नवलसिंग राजे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

क्रिकेटच्या या भव्य सोहळ्यामुळे चोपडा आणि परिसरातील क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!