आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या खांद्यावर ‘निवडणूक प्रमुख’ पदाची धुरा; भाजपचा मास्टरस्ट्रोक!
कार्यकर्त्यांचा जल्लोष! राजूमामांच्या नेतृत्वावर भाजपचा विश्वास,जळगाव महापालिकेत कमळ फुलणार?

जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकेच्या आगामी २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच भारतीय जनता पार्टीने आपला ‘हुकुमी एक्का’ बाहेर काढला आहे. जळगाव शहराच्या राजकारणावर ज्यांची जबरदस्त पकड आहे आणि कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत समजले जाणारे लोकप्रिय आमदार श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी ‘निवडणूक प्रमुख’ पदी निवड करण्यात आली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राजूमामांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या संघटन कौशल्यावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. प्रदेशाध्यक्षांनी दाखवलेला हा विश्वास राजूमामांच्या राजकीय कारकीर्दीतील एक मानाचा तुरा ठरला आहे.
⚡ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष! ही घोषणा होताच जळगावमधील भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे. राजूमामांचे संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची घट्ट ‘नाळ’ आणि कोणतीही निवडणूक जिंकण्याची जिद्द, यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच ‘भगवा’ फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. राजूमामांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भाजपची फौज आता सज्ज झाली आहे.
🎯 लक्ष्य एकच – महापालिकेत कमळ फुलवणार! निवडणूक प्रमुखाची जबाबदारी मिळताच, जळगावच्या विकासासाठी आणि पक्षाच्या विजयासाठी आपण कटिबद्ध असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. “राजूमामांची निवड म्हणजे विजयाची पहिली पायरी,” अशी भावना समर्थकांमध्ये दिसून येत आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांचे हार्दिक अभिनंदन



