बातम्या

एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी — जळगाव हादरलं!

खडसे कुटुंबावर आणखी एक धक्का! पेट्रोल पंपानंतर आता बंगल्यात चोरी!

जळगाव: जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव: जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या 'मुक्ताई' बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मागील महिन्यातच खडसे यांच्या स्नुषा आणि मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना ताजी असतानाच, आता थेट त्यांच्या जळगावमधील निवासस्थानी चोरी झाल्याने राजकीय नेत्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताई नगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील 'मुक्ताई' बंगल्याला कुलूप लावलेले होते. आज सकाळी खडसे यांच्याकडील कर्मचारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर आले असता, त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले, ज्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. घडलेल्या प्रकाराची माहिती तात्काळ एकनाथ खडसे यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे धाव घेतली असून, पंचनामा करण्याची आणि तपास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका प्रमुख राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीत नेमके किती नुकसान झाले आहे किंवा कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची नेमकी माहिती पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मागील महिन्यातच खडसे यांच्या सून आणि मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना ताजी असतानाच, आता थेट त्यांच्या जळगावमधील निवासस्थानी चोरी झाल्याने राजकीय नेत्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताई नगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्याला कुलूप लावलेले होते. आज सकाळी खडसे यांच्याकडील कर्मचारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर आले असता, त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले, ज्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

घडलेल्या प्रकाराची माहिती तात्काळ एकनाथ खडसे यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे धाव घेतली असून, पंचनामा करण्याची आणि तपास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एका प्रमुख राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीत नेमके किती नुकसान झाले आहे किंवा कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची नेमकी माहिती पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात झालेल्या चोरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या चोरीत चोरट्यांनी सुमारे ४९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ तोळे वजनाचा एक हार (गहूपोत) तसेच ₹ ३५,००० रोख रक्कम लंपास केली आहे.

मागील महिन्यातच मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना ताजी असताना, आता थेट राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरी झालेल्या दागिन्यांचा सूत्रांची तपशील खालीलप्रमाणे:

  • सोन्याचे दागिने (Gold Ornaments):
  • गहूपोत (नेकलेस) : २ तोळे
  • कानातले (Earrings) : ४ ग्रॅम
  • कानातले (Earrings) : ८ ग्रॅम
  • दोन अंगठ्या (Two Rings) : ३ ग्रॅम (प्रत्येकी)
  • गोफ (चेन) : १० ग्रॅम
  • डायमंड कर्णफुले (Diamond Studs) : ४ ग्रॅम
  • पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या (Four Rings of Five Grams each) : २० ग्रॅम (एकूण)
  • रोख रक्कम (Cash): ₹ ३५,०००

घटनास्थळी श्वानपथक

एकनाथ खडसे यांच्या चोरीच्या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी याविषयीची माहिती दिली. 868 ग्रॅम एवढं सोन आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आल्यास पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासणी केली जात असून अद्याप संदर्भातली कुठलेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

या चोरीच्या घटनेविषयी एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. जळगाव शहरातील शिवराम नगरमध्ये निवासस्थानी रात्री ही चोरी झाली. सकाळी हा प्रकार उघड झाला. चोरट्यांनी घरातील सामानाची आचकउचक केली आहे. माझ्या रुममधील 5 ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपये रोख होते. गोपाळच्या रुममध्ये त्याच्या पत्नीची गहुपोत होती. एकंदरीत त्यांच्या रुममधून सात आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले आहे. रक्षा खडसे यांची रुमही शेजारीच आहे. तिथेही सामान उचकलेले आहे. वॉचमन सुट्टीवर होता. रात्री केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. पोलिसांना या घटनेची आता सकाळी माहिती देण्यात आली. पोलीस दाखल झाले आहेत आणि ते तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

चोरीत काय चोरीला गेले आणि चोर कोण? — याबाबतचा तपास सुरू आहे, पुढील माहिती मिळताच अपडेट केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!