प्रभाग क्र. ८-ब: ‘कमळ’ चिन्हावर मानसी भोईटे यांची प्रबळ दावेदारी; विकासाचा वेग वाढवण्याचा निर्धार

जळगाव । विशेष प्रतिनिधी । शहराच्या इतिहासात एक नवे, तेजस्वी आणि कृतीशील व्यक्तिमत्त्व उदयास येत आहे. प्रभाग क्रमांक ८-ब मधून भाजपच्या (कमळ) चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मानसी निलेश भोईटे यांनी केवळ राजकीय घराण्याचा वारसा चालवण्यासाठी नव्हे, तर ‘विकासाचे व्हिजन’ घेऊन आपली उमेदवारी सिद्ध केली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये ना. गिरीशभाऊ महाजन आणि आ. राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सासूबाई आणि माजी नगराध्यक्ष लताताई भोईटे यांनी प्रभागात विक्रमी आणि अभूतपूर्व विकासकामांचा धडाका लावला. हाच विकासाचा वारसा आता मानसी भोईटे यांच्या रूपाने एका उच्चशिक्षित, संवेदनशील आणि आधुनिक विचारसरणीच्या नेतृत्वाकडे सोपवला जात आहे.
‘होम सायन्स’ ते ‘डिजिटल मार्केटिंग’: आधुनिक शिक्षणाची जोड
मानसी भोईटे यांचे व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या उच्च शिक्षणातून आणि अनेक क्षेत्रांतील प्राविण्यामुळे बहुआयामी बनले आहे. त्यांच्याकडे केवळ राजकीय वारसा नसून, स्वयं-अध्ययन आणि लक्षणीय शैक्षणिक पात्रता आहे.
शिक्षण: त्यांनी ‘होम सायन्स’ विषयात पदवी घेतली आहे, ज्यामुळे कुटुंबाचे आरोग्य आणि व्यवस्थापन यात त्या निपुण आहेत.
आधुनिक कौशल्ये: आजच्या काळाची गरज ओळखून त्यांनी ‘डिजिटल मार्केटिंग’चे शिक्षण घेतले आहे.
आरोग्य आणि योग: शहरातील नागरिकांना सुदृढ आरोग्याची दिशा देण्यासाठी त्यांनी ‘योग शिक्षण पदविका’, ‘बाल संस्कार योग प्रशिक्षण’ आणि ‘आंतरराष्ट्रीय न्यूट्रिशन कोच’ म्हणून नैपुण्य मिळवले आहे.
कला आणि संस्कृती: त्या केवळ अभ्यासू नसून उत्तम ‘आर्टिस्ट’ देखील आहेत. कॅनव्हास पेंटिंग, क्ले आर्ट आणि टेक्सचर पेंटिंगमध्ये त्यांनी सुरेख काम केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
मानसी भोईटे यांच्या कार्याची दखल केवळ स्थानिक नाही, तर जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे:
अझरबैजान येथे त्यांना ‘ग्लोबल वुमन अवॉर्ड २०२४’ ने गौरविण्यात आले.
दुबई येथे ‘आयकॉन ऑफ आशिया’ पुरस्काराने सन्मानित.
भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि मंदाकिनी यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान झाला आहे.



