बातम्या
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…

प्रधानमंत्री हवमानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत २०२३-२४ या हंगामासाठी (आंबीयाबहार) जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना ३६२ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली असून, लवकरच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित केली जाणार आहे. राज्यात ८०० कोटीहून अधिकची रक्कम मंजूर झाली असून, सर्वाधिक रक्कम ही जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या रकमेमुळे जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.



