बातम्या

“सत्ता नव्हे, सेवा हवी! बबलू बऱ्हाटेंचं वेगळं राजकारण लोकांच्या मनात घर करतंय!”

"गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबलू बऱ्हाटेंची ‘सेवा यात्रा’!"

भुसावळ :‘साथ द्या, साथ मिळेल!’ हे केवळ निवडणूक घोषवाक्य नाही, तर युवा नेतृत्व बबलू बऱ्हाटे यांच्या आजवरच्या समाजकारणाचा आधारस्तंभ आहे. आजच्या काळात राजकारण आणि समाजकारण यांच्या व्याख्या पूर्णपणे बदलल्या आहेत. सत्तेसाठी धडपडणारी गर्दी मोठी असताना, सत्तेचा उपयोग केवळ सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी करणारे नेते दुर्मिळच म्हणावे लागतील. भुसावळच्या राजकारणात बबलू बऱ्हाटे यांनी याच दुर्मिळ परंपरेचा ध्वज अभिमानाने फडकवला आहे.

शिवसेनेशी निष्ठा आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या बबलू बऱ्हाटे यांनी आपले राजकारण लोकांच्या दुखः आणि गरजांवर उभे केले आहे. राजकारणातून सत्ता मिळवून स्वार्थ साधण्याऐवजी, त्याचा उपयोग जनसेवा आणि विकास यासाठी कसा करायचा, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. हीच त्यांची खरी ताकद आहे. एखाद्या प्रभागात बालकापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ज्याला आपला मानतो, त्याचे यश केवळ पदामुळे नव्हे, तर त्याच्या सहकार्याच्या आणि संवेदनशीलतेच्या भूमिकेमुळे सिद्ध होते.

एखाद्या नेतृत्वाची खरी परीक्षा ही संकटाच्या काळात होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बबलू बऱ्हाटे आणि त्यांच्या कुटुंबाला जेव्हा संसर्ग झाला, तेव्हा विलगीकरण कक्षातील आणि बाधितांच्या वेदनांचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला. याच अनुभवाने त्यांना अधिक कठोर आणि संवेदनशील बनवले. ‘मी जे भोगले, ते इतरांना भोगावे लागू नये,’ या तळमळीतून त्यांनी कोरोना योद्धा म्हणून अविरत कार्य सुरू केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने लॉकडाऊनमध्ये शेकडो कुटुंबांना शिधा पोहोचवणे असो, घरोघरी प्रबोधन करणे असो, की दुसऱ्या लाटेत गरजू रुग्णांना औषधे आणि उपचारांसाठी धावपळ करणे असो—बबलू बऱ्हाटे यांनी आपली जबाबदारी कोणत्याही अपेक्षाविना निभावली. संकटाच्या काळात केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष कृतीतून मदतीला धावणारे हे नेतृत्व भुसावळ शहरासाठी मोलाचे वरदान ठरले.


संकटकाळानंतरही त्यांचे समाजकार्य थांबले नाही. युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पदयात्रा काढणे, खेळांना प्रोत्साहन देणे, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महापुरुषांच्या जयंती उत्साहात करणे, तसेच युवकांना संघटित करून त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हे त्यांचे नियमित कार्य आहे.

विशेषतः प्रभाग क्र. ११ अ मधील नागरिकांसाठी नियमित मोफत आरोग्य शिबिरे घेऊन आरोग्य सुविधा घरापर्यंत पोहोचवण्याची तळमळ त्यांच्यात दिसते. तसेच, प्रभाग क्र. ११ अ च्या विकासासाठी पाठपुरावा करून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. विकासकामांना प्राधान्य देऊन, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर त्यांचा कटाक्ष असतो.

आज भुसावळ शहराला केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक दृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. ‘साथ द्या, साथ मिळेल’ हे ब्रीद घेऊन समाजकारणाच्या भक्कम पायावर उभे असलेले बबलू बऱ्हाटे हे याच बदलाचे खरे प्रतीक आहेत. प्रभाग क्र. ११ अ मधील नागरिकांचे प्रतिनिधित्व करताना निवडणुकीपुरते राजकारण न करता, २४ तास सेवेसाठी तत्पर असणारे आणि आपल्या अनुभवातून इतरांचे दुःख समजून घेणारे हे युवा नेतृत्व भुसावळच्या विकासासाठी निश्चितच एक जोरदार आणि आश्वासक पर्याय आहे. शहराने या प्रामाणिक नेतृत्वाला साथ द्यावी!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!