जळगाव महापालिकेच्या रणांगणात एकच हुकुमी एक्का : आमदार राजूमामा भोळे!
'चाणक्य' आणि सर्वसामान्यांचा 'हक्काचा माणूस' म्हणून राजूमामांची जादू पुन्हा चालणार!

जळगाव : सध्या जळगाव महापालिका निवडणुकीचा धुराळा जोरात उडत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पण या सर्व कोलाहलात एक नाव अत्यंत शांतपणे पण तितक्याच प्रभावीपणे संपूर्ण निवडणुकीची सूत्रे हलवत आहे, ते म्हणजे- आमदार राजूमामा भोळे! जळगावच्या राजकारणात सध्या महायुतीची जी एकतर्फी हवा निर्माण झाली आहे, त्याचे खरे शिल्पकार आणि ‘पॉवर हाऊस’ हे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द राजूमामाच आहेत, हे आता विरोधकांनीही मान्य केले आहे.
मुत्सद्दीपणा आणि नाराजीवर ‘मामां’ची फुंकर निवडणुकीच्या सुरुवातीला महायुतीमध्ये बंडखोरीचे आणि नाराजीचे काळे ढग जमा झाले होते. इच्छुकांची गर्दी आणि नेत्यांचा हट्ट पाहता, युतीत ठिणगी पडेल की काय? अशी भीती होती. पण तिथेच आमदार राजूमामांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागली. त्यांनी केवळ परिस्थिती हाताळली नाही, तर ती जिंकली! प्रभारी आ. मंगेश चव्हाण यांच्यासोबत भक्कम ट्युनिंग जमवत आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्याशी योग्य समन्वय साधत त्यांनी महायुतीचा गड अभेद्य ठेवला. निवडणूक लढण्याआधीच तब्बल १२ जागा बिनविरोध निवडून आणणे, हा राजूमामांच्या ‘मास्टरस्ट्रोक’चाच परिणाम आहे.
एसी रूममधील नेते नव्हे, तर ‘रस्त्यावरचा सेनापती’ इतर नेते जिथे केवळ आदेश सोडण्यात धन्यता मानतात, तिथे राजूमामा प्रत्यक्ष रणांगणात उतरले आहेत. ते केवळ ‘सेनापती’ म्हणून थांबले नाहीत, तर एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी जळगाव शहर पिंजून काढले आहे. तिसऱ्यांदा आमदार असूनही त्यांच्यातील कार्यकर्ता आजही तितकाच जिवंत आहे. जिथे विरोधक विखुरलेले आहेत, तिथे मामांच्या नेतृत्वाखाली महायुती एकसंघपणे लढत आहे, हेच या निवडणुकीचे सर्वात मोठे बलस्थान आहे.
२४ तास ‘ऑन ड्युटी’ असलेला लोकनेता राजूमामांच्या लोकप्रियतेचे गुपित त्यांच्या स्वभावात दडले आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते नसते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. सुख असो वा दुःख, लग्न सोहळा असो वा अंत्ययात्रा, प्रोटोकॉल तोडून सामान्यांच्या खांद्याला खांदा लावणारा हा नेता आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे नेत्यांचे पी.ए. फोन उचलतात, तिथे “राजूमामांना कधीही कॉल करा, फोन ते स्वतःच उचलणार,” हा विश्वास जळगावकरांच्या मनात पक्का आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपले वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश दामू भोळे!
विजयाचा ‘मॅजिक नंबर’ मामांच्या हाती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले प्रचंड मताधिक्य हे राजूमामांच्या जनसंपर्काची पावती होती. आता महापालिकेतही इतिहास घडणार, याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कारण या निवडणुकीत मतदार उमेदवाराकडे बघून नाही, तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या ‘राजूमामांकडे’ बघून मतदान करणार आहेत.
जळगाव शहराच्या विकासाचा ध्यास आणि माणसं जोडण्याची अनोखी कला अवगत असलेल्या आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली महायुती विजयाचा गुलाल उधळणार, हे आता केवळ भाकीत नसून काळ्या दगडावरची रेघ मानली जात आहे!
थोडक्यात सांगायचे तर : “राजकारणात पदं येतात आणि जातात, पण जनतेच्या काळजात घर करणारे नेते क्वचितच सापडतात. आमदार राजूमामा भोळे हे त्यातीलच एक दुर्मिळ रसायन आहे!”



