धरणगाव नगराध्यक्ष निवडणूक: ‘!सौ. वैशालीताई भावे उद्या अर्ज भरणार
माजी नगराध्यक्ष सलीम पटेलांच्या कार्यालयातून निघणार भव्य रॅली, राजकीय वातावरण तापले!

धरणगाव, दि. १६ :धरणगाव नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या होत असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी) अधिकृत उमेदवार सौ. वैशालीताई विनय (पप्पू) भावे या उद्या, दिनांक १७ नोव्हेंबर (सोमवार) रोजी, आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यानिमित्ताने महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून जोरदार जय्यत तयारी करण्यात आली आहे.
उद्या सकाळी ठीक ९:३० वाजता, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम भाई पटेल यांच्या आठवडे बाजारातील शंकर सॉमिलसमोरील कार्यालयात महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र जमणार आहेत. येथूनच सौ. वैशालीताई भावे या भव्य रॅलीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत.महायुतीच्या या ‘मेगा शो’ द्वारे आपली एकजूट आणि ताकद दाखवण्याचा निर्धार नेत्यांनी केला आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच धरणगाव शहरातील नागरिकांना या रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
उद्याच्या या धरणगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या उमेदवारी अर्ज दाखल सोहळ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



