बातम्या

पाळधीतील जुगार अड्ड्यावर LCB ची मोठी छापेमारी

पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व टीमचा धडाका! – 16 अटक, ₹12 लाख जप्त

जळगाव | दि. 08/09/2025 जळगांव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळधी येथे अवैध जुगार अड्ड्यावर धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १६ आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून एकूण ₹12,24,260/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

📌 मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की पाळधी येथे अवैध जुगार अड्डा सुरु आहे. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा कारवाई केली.

या पथकात पोहकों/अक्रम शेख, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोहकों/मुरलीधर धनगर, पोहेकॉ नितीन बावीस्कर, पोहकों/सलीम तडवी, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेको/विजय पाटील, पोकों/रंविंद्र चौधरी, पोकॉ/रविंद्र कापडने, पोकों/सिध्देश्वर डापकर, पोकॉ/राहुल रगडे, पोकों/रतन गिते, पोकों/मयुर निकम, चापोहेकॉ/भारत पाटील, चापोकों/महेश सोमवंशी, चापाको/प्रमोद ठाकुर यांचा समावेश होता.

📍 छापा पाळधी येथील शाम कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मारण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम ₹7,22,260/- व ₹5,02,000/- किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ₹12,24,260/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

🔹 सदर आरोपींवर धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

👉 ही संपूर्ण कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ, मा. आण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा उपविभाग, तसेच श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात पोउपनि. शरद बागल व पथकातील अधिकारी तसेच पाळधी दूरक्षेत्राचे सपोनि. प्रशांत कंडारे, पोकों/अमोल धोबी, पोकॉ/रविंद्र चौधरी यांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!