राजकारण

प्रभाग १२ (आ) मधून इच्छुक उमेदवार म्हणून डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव यांचे नाव चर्चेत

सेवेच्या बळावर जनतेचा विश्वास, भाजपमध्ये सक्रिय नेतृत्वाची ओळख

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ (आ) मधून इच्छुक उमेदवार म्हणून डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये वेगाने चर्चेत आले आहे. स्वच्छ प्रतिमा, सेवाभाव आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. भालेराव हे BHMS डॉक्टर असून ते 2019 पासून भारतीय जनता पार्टीत सक्रियपणे कार्यरत आहेत. सध्या ते भाजप महानगर कार्यकारणी सदस्य, माजी महानगर चिटणीस जळगाव, तसेच माजी सरचिटणीस – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, जळगाव या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत.

विशेष म्हणजे, कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात विश्वास निर्माण केला आहे. “सतत रुग्णसेवा हाच ध्यास” हे त्यांचे ब्रीद असून, विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.

कोरोनाच्या भीषण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी शेकडो रुग्णांना बेड, ऑक्सिजन, अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था, तसेच गरजू कुटुंबांना अन्नधान्य व आवश्यक साहित्य वेळेवर पोहोचवले. त्यांच्या वेगवान निर्णयक्षमता आणि तत्काळ मदतीच्या वृत्तीमुळे अनेकांचे प्राण वाचले, अशी भावना आजही शहरातील नागरिक व्यक्त करतात. त्यांच्या या कार्याची आजही सर्व स्तरातून प्रशंसा केली जाते.

स्वच्छ चारित्र्य, शिस्तबद्ध कार्यशैली, संघटनात्मक अनुभव आणि जनतेसाठी 24×7 उपलब्ध राहण्याची वृत्ती यामुळे डॉ. क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव हे प्रभाग १२ (आ) मधील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह, सक्षम आणि भविष्याभिमुख नेतृत्वाचा पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

आगामी निवडणुकीत भाजपकडून संधी मिळाल्यास, विकास, आरोग्य सुविधा, स्वच्छता, मूलभूत नागरी सोयी आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याचा त्यांचा ठाम निर्धार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे प्रभाग १२ (आ) मध्ये त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा दिवसेंदिवस अधिक बळावत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!