राजकारण

जळगावात भाजपची ताकद वाढली! निवृत्त पीएसआय भास्करराव पाटील यांचा ‘राजुमामां’च्या उपस्थितीत दणक्यात भाजप प्रवेश

निवृत्त PSI भास्करराव पाटील आता भाजपचे शिलेदार!

जळगाव: जळगाव पोलीस दलातील प्रदीर्घ आणि शिस्तप्रिय सेवेनंतर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक (PSI) भास्करराव पाटील यांनी आता राजकीय मैदानात उडी घेतली आहे. काल दिनांक २५ डिसेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ‘कमळ’ हाती घेतले. जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

जी.एम. फाऊंडेशन येथील भाजप कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी भास्करराव पाटील यांचा यथोचित सन्मान केला. भाजपचा गमछा गळ्यात घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी पाटील यांचे पक्षात जंगी स्वागत केले. “एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या येण्याने पक्षाला शिस्त आणि अनुभवाची जोड मिळेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उदयजी भालेराव, भगतभाई बालाणी, तसेच जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार आणि मुकुंद मेटकर यांची विशेष उपस्थिती होती.

भास्करराव पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे जळगाव शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करत भास्करराव पाटील यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!