राजकारण

जळगाव बसस्थानकावरील ‘मंगळसूत्र चोरांना’ एलसीबीने ठोकल्या बेड्या; दोन महिलांना बुलढाण्याहून घेतले ताब्यात

गर्दीचा फायदा घेऊन दागिने लंपास करणाऱ्या दोन महिला जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

जळगाव: बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पोत लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या महिलांकडून चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी मुद्देमालही हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

जळगाव बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.

तपासाचे चक्र आणि अटक

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला. यादरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन महिलांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या महिला: १) माया दहिमल भोसले उर्फ माया उदय पवार (वय २० वर्षे) २) अंकीता अर्जुन पवार (वय ३५ वर्षे) (दोन्ही राहणार: पळासखेडा, ता. चिखली, जि. बुलढाणा)

दोन गुन्हे उघड, मुद्देमाल जप्त

ताब्यात घेतलेल्या महिलांनी गेल्या एक-दीड महिन्यात जळगाव बसस्थानकावर दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे कबूल केले. या कबुलीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:

  • गुन्हा रजि. नं. ३१५/२०२५ (BNS ३०३(२))

  • गुन्हा रजि. नं. ३१८/२०२५ (BNS ३०३(२))

पोलिसांनी या महिलांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासासाठी त्यांना जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तपास पथक

सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि. जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, श्रे. पोउपनि. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोहेकॉ/हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, पोअ. गोपाल पाटील, राहुल कोळी, मपोहेकॉ/अभिलाशा चहाटे, मपोना. श्रध्दा सोनवणे, मपोअ. दर्शना पाटील, प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक पोहेकॉ/दिपक चौधरी सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!