राजकारण

ओंकारेश्वराच्या साक्षीने फुटला प्रचाराचा ‘नारळ’! स्वप्निल परदेशींच्या रॅलीत जनसागराची लाट; प्रभाग १२ मध्ये विजयाचा गजर!

जळगाव (विशेष प्रतिनिधी): “शुभ कार्याची सुरुवात ओंकारेश्वराच्या आशीर्वादानेच होते,” आणि आज हेच चित्र जळगावमध्ये पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ चे लोकप्रिय अपक्ष उमेदवार श्री. स्वप्निल अशोक परदेशी यांनी आज जळगावचे आराध्य दैवत ओंकारेश्वर मंदिर येथे महापूजा करून आणि श्रीफळ (नारळ) वाढवून आपल्या प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ केला. यावेळी उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाने ओंकारेश्वर मंदिराचा परिसर अक्षरशः फुलून गेला होता.

नारळ’ चिन्हाचा दुग्धशर्करा योग!
विशेष आणि आनंदाची बाब म्हणजे, स्वप्निल परदेशी यांना निवडणूक आयोगाकडून ‘नारळ’ हेच चिन्ह मिळाले आहे आणि आज प्रचाराची सुरुवातही देवाच्या चरणी ‘नारळ’ फोडून झाली. “हा देवाचाच संकेत आहे. आज मंदिरात नारळ फुटलाय, १५ तारखेला ईव्हीएम मशीनवर विरोधकांचे स्वप्न फुटणार आणि स्वप्निल भाऊंचा विजयाचा नारळ फुटणार,” अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

स्वप्निल परदेशींचा निर्धार:
नारळ फोडल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना स्वप्निल परदेशी म्हणाले, “मी आज महादेवाच्या साक्षीने शपथ घेतो की, प्रभाग १२ ‘ड’ मधील जनतेचा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. ही गर्दी नाही, तर हे माझे कुटुंब आहे. माझा अनुक्रमांक ६ आणि चिन्ह ‘नारळ’ आता घराघरात पोहोचले आहे. हा प्रतिसाद असाच ठेवा, विकास मी तुमच्या दारात आणून देईन.”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!