जळगाव महापालिका निवडणूक: प्रभाग १७ ‘ड’ मध्ये प्रशांत नाईक यांच्या प्रचाराचा ‘धडाकेबाज’ शुभारंभ!
'घड्याळ' चिन्हाचा गजर; प्रचाराचे नारळ फोडताना जनसागर लोटला, विजयाचा गुलाल उधळणारच - समर्थकांचा विश्वास

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक १७ ‘ड’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे अधिकृत उमेदवार प्रशांत सुरेश नाईक यांच्या प्रचारार्थ आज विधिवत नारळ फोडून प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशांत नाईक यांच्या समर्थनासाठी प्रभागात मोठी गर्दी उसळली होती, ज्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
जनशक्तीचा अभूतपूर्व प्रतिसाद ‘घड्याळ’ या निशानीवर निवडणूक लढवत असलेल्या प्रशांत नाईक यांच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक, महिला, तरुण आणि जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी “प्रशांत भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि “राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आज जमलेली गर्दी ही प्रशांत नाईक यांच्यावरील जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचे बोलले जात आहे.
विकासाच्या मुद्द्यावर भर प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर प्रशांत नाईक यांनी मतदारांशी संवाद साधला. प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरी समस्या सोडवणे हेच आपले प्रथम कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. “अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि ‘घड्याळ’ चिन्हाच्या साथीने प्रभागाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या शक्तीप्रदर्शनामुळे प्रभाग १७ ‘ड’ मध्ये प्रशांत नाईक यांची हवा निर्माण झाली असून, निवडणुकीतील चुरस वाढली आहे.




