बातम्या

अमळनेर रणसंग्राम: प्रभाग १४ मध्ये सौ. ज्योती पंकज शेटे यांचा झंझावात

डॉ. बाविस्करांच्या साथीने प्रचाराचा नारळ फुटला!

अमळनेर (जळगाव): अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ (अ) मध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या रणरागिणी आणि लोकप्रिय उमेदवार सौ. ज्योती पंकज शेटे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा नारळ वाढवला. डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या पॅनलमधून लढताना सौ. शेटे यांनी पहिल्याच दिवशी घेतलेली आक्रमक आघाडी विरोधकांची झोप उडवणारी ठरली आहे.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये आज झालेली गर्दी ही केवळ राजकीय रॅली नसून, तो सौ. ज्योती शेटे यांच्या जनसंपर्काचा पुरावा होता. विशेषतः महिला वर्गाचा आणि प्रभागातील माता-भगिनींचा त्यांना मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. “घरातील गृहिणी ते सभागृहातील लोकप्रतिनिधी” हा प्रवास त्या सक्षमपणे पेलावतील, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला. प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सौ. ज्योती शेटे यांनी प्रभागातील समस्यांवर बोट ठेवत, “केवळ खुर्चीसाठी नव्हे, तर प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी मैदानात उतरले आहे,” असा स्पष्ट संदेश दिला.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर आणि प्रभाग १४ मधील सहकारी उमेदवार प्रवीणकुमार पाठक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असला तरी, आजच्या दिवसाचे खरे आकर्षण सौ. ज्योती शेटे यांचे नियोजन आणि त्यांचा आक्रमक प्रचार ठरले. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे नियोजन त्यांनी आधीच पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.

नारळ वाढवल्यानंतर बोलताना सौ. ज्योती पंकज शेटे म्हणाल्या, “प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे. मतदारांनी दाखवलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन आणि प्रचंड मताधिक्याने विजय खेचून आणू.” सौ. ज्योती शेटे यांची उमेदवारी ही डॉ. बाविस्कर यांच्या पॅनलसाठी ‘हुकमी एक्का’ मानली जात आहे. पंकज शेटे यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि सौ. ज्योती शेटे यांचा महिलांशी असलेला थेट संवाद, यामुळे प्रभाग १४ (अ) मध्ये हे पारडे जड मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!