बातम्या

शुभसंकेत! प्रभाग १२ ‘ड’ मध्ये आता फुटणार ‘विजयाचा नारळ’! स्वप्निल परदेशींना मिळाली ‘नारळ’ ही निशाणी!

जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ मधील अपक्ष उमेदवार स्वप्निल अशोक परदेशी यांच्या विजयावर आज निसर्गाने आणि नशिबानेही शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगाकडून आज चिन्ह वाटप करण्यात आले असून, स्वप्निल परदेशी यांना ‘नारळ’ (Coconut) हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाणारे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह मिळताच प्रभागातील समर्थकांनी “आता विजयाचा नारळ फुटणार,” असा एकच जल्लोष केला.

​’नारळ’ चिन्हच का ठरणार गेमचेंजर?

आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याची, पूजेची किंवा नवीन वास्तूची सुरुवात ‘नारळ’ वाढवूनच केली जाते. स्वप्निल परदेशी यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाचा जो संकल्प केला आहे, त्याला आता या ‘नारळ’ चिन्हामुळे धार्मिक आणि भावनिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. “हे चिन्ह केवळ एक निशाणी नसून, तो प्रभागाच्या विकासाचा शुभशकुन आहे,” अशी भावना महिला वर्गातून व्यक्त होत आहे.

​”जसा नारळ गोड, तसाच आमचा उमेदवार!”

चिन्ह मिळाल्यानंतर मतदारांनी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. एका ज्येष्ठ नागरिक महिलेने सांगितले, “नारळ बाहेरून टणक असतो पण आतून गोड आणि शीतल पाणी देतो. आमचे स्वप्निल भाऊ पण तसेच आहेत. कामासाठी आणि अन्यायाविरुद्ध ते टणक आहेत, पण आमच्यासाठी त्यांचे मन नारळाच्या पाण्यासारखे निर्मळ आहे. त्यामुळे हे चिन्ह त्यांना अगदी शोभून दिसते.”

घराघरात ‘नारळ’, मनात स्वप्निल भाऊ!

अपक्ष उमेदवार म्हणून लढताना चिन्ह कोणते मिळणार, याची उत्सुकता होती. पण ‘नारळ’ हे चिन्ह मतदारांच्या रोजच्या वापरातील आणि ओळखीचे असल्याने ते लोकांच्या लक्षात राहणे खूप सोपे झाले आहे. आता विरोधकांची झोप उडाली असून, “बटण दाबणार नारळावर, आणि स्वप्निल भाऊ जिंकणार जोरावर!” अशा घोषणांनी प्रभाग १२ ‘ड’ दणाणून गेला आहे.

शांततीत क्रांती आणि आता ‘नारळ’ हाती!

स्वप्निल परदेशी यांनी अर्ज भरताना शांतता पाळली होती. आता चिन्ह मिळाल्यावरही त्यांनी बडेजाव न करता, थेट मतदारांच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली आहे. १५ जानेवारीला ईव्हीएम मशीनवरील ‘नारळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदार परिवर्तनाची क्रांती घडवणार, हे १००% निश्चित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!