एलसीबीचा थरार! पसार झालेले सराईत गुन्हेगार दिल्ली-अजमेर-दोंडाईचा सफरीनंतर जेरबंद!
चालत्या गाडीमधून उडी मारून पसार झालेले आरोपी अखेर सापडले

जळगांव: जळगांव जिल्ह्याच्या वाढत्या गुरे चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखा (L.C.B.), जळगांव येथील पथकाने जिल्ह्यामध्ये गुरे चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींचा कसून शोध सुरू केला होता. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर, दि. २२.१०.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला खालील आरोपी निष्पन्न झाले:
१. शाकीर शहा अरमान शहा, रा. सुप्रीम कॉलणी, जळगांव
२. अमजद शेख फकिर कुरेशी, रा. अशोक किराणा जवळ, मेहरुण, जळगांव
३. आफताब आलम शेख रहीम, रा. नशिराबाद, ता.जि. जळगांव
४. अकील कादीर पिंजारी, रा. आझाद नगर पिंप्राळा हुडको, जळगांव
या आरोपींनी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुरे चोरीचे गुन्हे आणि पहुर पोलीस स्टेशन हद्दीतील एक गुन्हा केल्याची कबुली दिली.
🏃🏻 चालत्या वाहनातून पसार होण्याचा थरार
या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकातील पो.हे.कॉ. संदीप रमेश पाटील, पो.हे.कॉ. प्रविण जर्नादन मांडोळे, पो.हे.कॉ. हरीलाल पाटील, पो.कॉ. राहुल कोळी हे शासकीय वाहनातून अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील गुरे चोरीच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी घेऊन जात होते.
दरम्यान, रात्री २३.३० वाजेच्या सुमारास चांदणीकुहे, ता. अमळनेर गावाजवळील रेल्वे बोगद्याजवळील स्पीड ब्रेकरवर शासकीय वाहन हळू झाले. याच संधीचा फायदा घेत वाहनाच्या मागील बाजूस बसलेले आरोपी १) शाकीर शहा अरमान शहा आणि २) अमजद शेख फकिर कुरेशी यांनी चालत्या वाहनातून उडी मारून पळ काढला आणि अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले.
या घटनेनंतर अमळनेर पोलीस स्टेशन येथे सी.सी.टि.एन.एस.क्र. ४२८/२०२५, भा.न्या.सं.क. २६२ प्रमाणे गुन्हा दि. २३/१०/२०२५ रोजी दाखल करण्यात आला होता.
🗺️ दिल्ली आणि अजमेरपर्यंत पाठलाग
पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, स्था.गु.शा. जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पो.उप.निरी. जितेंद्र वल्टे, पो.उप. निरी. शेखर डोमाळे, श्रे.पो.उप.निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. अक्रम शेख, पो.हे.कॉ. प्रवीण भालेराव, पो. कॉ. प्रदिप सपकाळे, चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी, चा.पो.हे.कॉ. भरत पाटील यांचा समावेश होता.
तयार केलेल्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून माहिती मिळवली असता, सदर आरोपी दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली.
- पथकाने दिल्ली येथे जाऊन दि. २७/१०/२०२५ रोजी आरोपी अमजद शेख फकिर कुरेशी (वय-३२, रा. अशोक किराणा जवळ मेहरुण, जळगांव) यास ताब्यात घेतले आणि दि. २८/१०/२०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले.
- ताब्यात घेतलेल्या आरोपी अमजद शेख याने चौकशीत सांगितले की, दुसरा आरोपी शाकीर शहा अरमान शहा हा दिल्लीहून अजमेर येथे गेला आहे. त्यानुसार, एक पथक अजमेरकडे रवाना झाले.
- अजमेर येथे शाकीर शहा याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत पुन्हा माहिती घेतली असता, तो दोंडाईचा येथे असल्याची माहिती मिळाली.
- पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ दोंडाईचा येथे धाव घेऊन आरोपी शाकीर शहा अरमान शहा (वय-२८, रा. सुप्रीम कॉलणी, जळगांव) यास दि. ३१.१०.२०२५ रोजी ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
👏🏻 यशस्वी कार्यवाही करणारे अधिकारी आणि अंमलदार
सदरची उल्लेखनीय कार्यवाही मा.श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परिमंडळ व मा.श्री विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर उपविभाग, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्था.गु.शा. जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.
या कार्यवाहीत पोउपनि. श्री जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, श्रे.पो.उप.निरी. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, पो.कॉ. प्रदिप सपकाळे, चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी, चा.पो.हे.कॉ. भरत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी सक्रिय सहभाग घेतला.



