जळगाव मनपा: प्रभाग १२-ड मध्ये परिवर्तनाची लाट; स्वप्नील परदेशींच्या प्रचारफेऱ्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
'नारळ' चिन्हाला माता-भगिनींची पसंती; 'लाडकी बहीण' योजनेच्या कामाची पोचपावती मिळत असल्याचा दावा

जळगाव | विशेष प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२-ड मधील चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. अपक्ष उमेदवार स्वप्नील अशोक परदेशी यांच्या प्रचार दौऱ्यांना प्रभागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मतदारांचा कल स्पष्टपणे परदेशी यांच्या बाजूने झुकल्याचे दिसून येत आहे. “केवळ आश्वासन नको, ठोस विकास हवा,” अशी भूमिका घेत मतदारांनी स्वप्नील परदेशी यांच्या ‘नारळ’ निषाणीवर पसंतीची मोहोर उमटवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र प्रचारफेऱ्यांमधील गर्दीवरून स्पष्ट होत आहे.
महिला आणि तरुणांचा मोठा पाठिंबा स्वप्नील परदेशी हे प्रचारासाठी प्रभागात फिरत असताना, जागोजागी महिलांकडून त्यांचे औक्षण केले जात आहे. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून परदेशी यांनी केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे बोलले जात आहे. “घरातीलच हक्काचा माणूस निवडणुकीला उभा आहे,” अशी भावना महिला वर्गात दिसून येत आहे. दुसरीकडे, उच्चशिक्षित आणि ‘व्हिजन’ असलेला तरुण उमेदवार मिळाल्याने युवा वर्गाचा ताफाही स्वप्नील परदेशींच्या प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे.
परदेशी घराण्याच्या ‘जनसेवे’वर विश्वास माजी नगरसेवक अशोक परदेशी आणि शोभा परदेशी यांनी आपल्या कार्यकाळात केलेला विकास आजही प्रभागातील जुन्या जाणत्या मतदारांच्या स्मरणात आहे. तोच वारसा स्वप्नील परदेशी चालवत असल्याने, ज्येष्ठ नागरिक स्वतःहून पुढे येत त्यांना आशीर्वाद देत आहेत. “प्रभागाचा खुंटलेला विकास केवळ परदेशीच मार्गी लावू शकतात,” अशी चर्चा चौकाचौकात रंगली आहे.
विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ ठरतेय प्रभावी नेहमीच्या राजकीय घोषणांपेक्षा स्वप्नील परदेशी यांनी मांडलेली विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ (Development Blue Print) मतदारांना भावली आहे. रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांसोबतच सामाजिक सुरक्षिततेचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार केवळ टीका-टिप्पणीत व्यस्त असताना, परदेशी यांनी मात्र थेट मतदारांच्या प्रश्नांना हात घातल्याने वातावरण त्यांच्या बाजूने फिरले आहे.



