विकासाच्या प्रकाशात निर्णयाचं नेतृत्व”; डॉ. भूषण महाजन यांची सावदा प्रभाग ७ ब मधून अपक्ष उमेदवारी दाखल

सावदा, (दिनांक १५ नोव्हेंबर):सावदा नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे (Savda Municipal Council Election 2025) वारे वाहू लागले असून, विविध प्रभागांमधून उमेदवार आता आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक ७ ब मधून डॉ. भूषण दिलीप महाजन (Dr. Bhushan Dilip Mahajan) यांनी “विकासाच्या प्रकाशात निर्णयाचं नेतृत्व” हा ध्यास घेऊन आपला अपक्ष (Independent) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
“ही केवळ निवडणूक नाही, तर परिवर्तनाचा अभ्यासपूर्ण विचार आहे. ज्ञानाची जोड आणि समाजसेवेची ओढ,” या विचारांसह आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची भावना डॉ. भूषण महाजन यांनी व्यक्त केली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “माझे ध्येय आणि धोरण हे केवळ राजकारण केंद्रित नसून, ते पूर्णपणे विकासात्मक दूरदृष्टीवर आधारित असेल. प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्यावर कायमस्वरूपी आणि अभ्यासपूर्ण तोडगा काढण्याला माझे प्रथम प्राधान्य राहील,” असे डॉ. महाजन म्हणाले.
येणाऱ्या काळात प्रभागातील सर्व मतदारांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा व विकासाच्या या प्रवाहात साथ देऊन सेवेची संधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत त्यांचे प्रमुख समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सुभाष प्रल्हाद महाजन, आकाश महाजन, दिलीप महाजन, अमित महाजन, प्रा. स्वप्नील महाजन, योगेश भार्गव, चंद्रकांत कुंभार, भीमा कुंभार, गोपाळ कुंभार, विजय भारंबे, आशिफ खाटिक, वासिम खाटीक, मुबारक तडवी, आबिद शेख आदींसह अनेक हितचिंतक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. महाजन यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे या प्रभागातील लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.



