जळगावातील प्रभाग ६ मधून कुणाल रावसाहेब मोरे इच्छुक, वार्डासाठी झळकणार नवा लखलखता सूर्य…

शहरातील पोलीस लाईन सह इतर परिसरात गेली १२ वर्षे पासून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना चालवणाऱ्या तसेच महाराष्ट्र पोलीस यांच्यासह प्रभागातील नागरिकांसाठी सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे परिसरात त्यांच्याबद्दल आदर, आत्मीयता व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता प्रभाग क्रमांक ६ मधून आगामी महानगरपालिका निवडणुकीत ते उमेदवारीसाठी रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. या कारणाने त्यांच्या कार्यकर्त्यात उत्सहाचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांनी त्यांना उमेदवार म्हणून पाहण्याची एकमुखी इच्छा व्यक्त केली आहे
श्री. कुणाल रावसाहेब मोरे “महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना” चे जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतून त्यांनी नागरिकांना स्वावलंबन व आत्मविश्वासाचा संदेश दिला आहे.
गेल्या काही वर्षांतील प्रमुख उपक्रम
#१५ ऑगस्ट रोजी भारत माता पूजन व भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
#महिला दिनानिमित्त विशेष सन्मान सोहळा आयोजन
#दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान
#महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरे करणे
#दिवाळीत साफसफाई कर्मचाऱ्यांना फराळ व गिफ्ट वाटप
#आरोग्य निदान शिबिरे व मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प आयोजन
#कोरोना काळात नागरिकांना व पत्रकारांना सेफ्टी किट वाटप
# प्रभागात स्वच्छता अभियान राबविले
नागरिकांचा विश्वास व नवीन चेहरा
कुणाल मोरे हे प्रभाग क्रमांक ६ मधील नवा, ऊर्जावान व कार्यक्षम चेहरा म्हणून पुढे येत आहेत. नागरिकांसाठीची बांधिलकी, सामाजिक कार्यातील सक्रियता आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
कोरोना काळातील निस्वार्थ सेवा
कोरोना महामारीच्या काळात कुणाल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांसाठी जेवण वितरण, सॅनिटायझर फवारणी आणि आरोग्य सुरक्षा उपक्रम राबवून उल्लेखनीय काम केले. तसेच ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवाना शीर खुरम्याच्या साहित्याचे वाटप करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
मागील काही वर्षांत कुणाल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष तोडगा काढण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल विश्वास व आत्मीयतेचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
कुणाल मोरे यांचे मत
“आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास जपणे आणि सर्वसमावेशक विकास साधणे हेच माझे ध्येय आहे. नागरिकांनी माझ्या पाठीशी राहून सहकार्य करावे, हीच माझी मनापासून अपेक्षा आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधून कुणाल मोरे यांच्या नावावर नागरिकांचा विश्वास व उत्साह वाढत आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक ६ मधून रिंगणात उतरल्यास, एक नवा उत्साही व लोकाभिमुख चेहरा नागरिकांना पाहायला मिळेल, असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.



