बातम्या

भुसावळच्या राजकीय आखाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार

रजनी संजय सावकारेंसाठी उद्या भव्य शक्तिप्रदर्शन

भुसावळ | विशेष प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून, भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा उद्या, सोमवारी (दि. २४) आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता नाहटा कॉलेज समोरील मैदानावर होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राजकीय महत्त्व आणि शक्तिप्रदर्शन

भुसावळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि सावकारे गटाचे येथे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचे आव्हान परतवून लावण्यासाठी आणि सौ. रजनी सावकारे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. या सभेच्या माध्यमातून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असून, भाजपचे हे मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे.

सभेचे नियोजन

ही सभा सोमवारी दुपारी ३:०० वाजता होणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष या सभेसाठी मोठी गर्दी जमवण्याच्या तयारीत आहेत. या सभेत मुख्यमंत्री भुसावळच्या विकासाचा कोणता नवा रोडमॅप मांडतात आणि विरोधकांचा समाचार कसा घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

सौ. रजनी सावकारे यांनी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

Chief Minister Devendra Fadnavis’ cannon will roar in the political arena of Bhusawal

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!