जळगाव एमआयडीसीत कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; १ महिलेसह २ पुरुष आरोपी ताब्यात, ५ पीडित महिला मिळून आल्या
MIDC मधील गुप्त कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा – खळबळजनक खुलासा

जळगाव: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका बिल्डिंग मध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर SDPO नितीन गणापुरे यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळी ५ पीडित व्यक्ती मिळून आल्या आहेत.
जळगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या नीलंबरी हॉटेलच्या मागे आणि हॉटेल सुनील सिंगच्या समोर एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा व्यवसाय (कुंटणखाना) सुरू असल्याची माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरेआणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेली १ महिला आरोपी आणि २ पुरुष आरोपी यांना पोलिसांनी पकडले आहे. तसेच घटनास्थळी ५ पीडित व्यक्ती आढळून आल्या असून, त्यांच्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक ही कामगिरी जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात खालील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा समावेश होता:
-
अधिकारी: API योगिता नरखेडे (AHTU – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष).
-
अंमलदार: उपविभागीय कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख,रवींद्र जाधव ,प्रणय पवार रवींद्र मोतीराया, निलेश जगताप.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे…..



