बातम्या

एमआयडीसीत धडक कारवाई! जेसीबीने उडवली बेकायदेशीर अतिक्रमणांची धुळधाण!

MIDC परिसरात मोठी कारवाई! अनेक दुकाने, शेड, बांधकामे जमीनदोस्त!

जळगाव शहरातील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरामध्ये गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. जळगाव औद्योगिक विकास महामंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत परिसरातील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केलीएमआयडीसी विभागातील अनेक भागांमध्ये व्यावसायिकांनी व इतरानी अवैधरित्या अतिक्रमणे केली होती. यामुळे केवळ वाहतुकीलाच अडथळा होत नव्हता, तर परिसराचे विद्रुपीकरणही झाले होते. या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने आज सकाळी धडक कारवाई सुरू केली

कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. या संपूर्ण मोहिमेवर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे हे स्वतः लक्ष ठेवून होते. त्यांच्यासोबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने अत्यंत नियोजित पद्धतीने ही मोहीम पार पाडली.

या संयुक्त कारवाईत परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसराने मोकळा श्वास घेतला असून, वाहतुकीचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. प्रशासनाच्या या कठोर आणि धडक कारवाईचे येथील उद्योजक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. यापुढेही एमआयडीसी परिसर अतिक्रमणमुक्तः ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!