बातम्या

नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा वाळू माफियांना दणका!

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाची मोठी कारवाई; अवैध वाळूचे ३ डंपर जप्त

​जळगाव: जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि राजरोसपणे वाहतूक करणाऱ्या माफियांवर आता पोलिसांचा फास आवळला जाऊ लागला आहे. जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या याच ‘अ‍ॅक्शन मोड’ ची प्रचिती नुकतीच आली असून, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने धडक कारवाई करत अवैध वाळूची वाहतूक करणारे तब्बल ३ डंपर रंगेहाथ पकडले आहेत. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

​गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैध वाळू माफिया सक्रिय झाल्याच्या आणि बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

​याच आदेशांचे पालन करत, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नितीन गणापुरे यांनी स्वतः लक्ष घालत एका विशेष आणि धडाडीच्या पोलीस पथकाची नियुक्ती केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या पथकाने रात्रीच्या वेळी अत्यंत शिताफीने सापळा रचला.

अशी केली धडक कारवाई:

अवैध वाळूने खचाखच भरलेले डंपर पसार करण्याच्या तयारीत असलेल्या माफियांना पोलिसांच्या या पथकाने गाठले. या कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख, अशोक फुसे, प्रणय पवार, अमोल ठाकूर, राहुल घेटे, नितीन ठाकूर आणि रवींद्र ताडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत धाडसाने या डंपर्सचा पाठलाग केला आणि तिन्ही डंपर जागच्या जागी जप्त केले. या सर्व डंपर्समध्ये लाखो रुपयांची अवैध वाळू भरलेली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!